महाराष्ट्र शासन
 सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई

प्रस्तावना : सांस्कृतिक कार्य संचालनालय

         महाराष्ट्र हे एक अत्यंत पुरोगामी आणि सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न असे राज्य आहे. अनेक कलाप्रकारांना आणि कलाकारांना महाराष्ट्राच्या या मातीने आणि रसिक प्रेक्षकांनी कायम प्रोत्साहन दिले आहे. विविध कला आणि कलाकारांप्रती राज्याच्या शासनकर्त्यांचा दृष्टीकोन उदार, सकारात्मक आणि प्रोत्साहनाचा आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे शासकीय पातळीवरील सांस्कृतिक कार्यासंबंधीच्या योजना कार्यान्वित करण्यात येतात. या राज्यातील सांस्कृतिक अंगाची लोकांना माहिती व्हावी, एक प्रकारचे भावनात्मक ऐक्य निर्माण व्हावे, तसेच सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांना प्रोत्साहन मिळावे या हेतूने महोत्सव आयोजित करण्यात येतात. त्यात राज्य नाट्य महोत्सव, राज्य चित्रपट महोत्सव, तसेच संगीत, नृत्य, तमाशा, कीर्तन, भजन, लोककला, खडी गमंत, शाहिरी आणि दशावतार महोत्सव इत्यादी विविध कला महोत्सव आयोजित करण्यात येतात. याशिवाय या संचालनालयातर्फे नाट्यप्रशिक्षण शिबिरे, तमाशा प्रशिक्षण शिबिरे, बालनाट्य प्रशिक्षण शिबिरे, कीर्तन प्रशिक्षण शिबिरे व शाहिरी प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्यात येतात. याशिवाय वयोवृद्ध, अपंग, आर्थिक स्थैर्य नसलेल्या कलाकारांना आर्थिक मदत प्रदान करणे, सांस्कृतिक कार्य क्षेत्रात कार्य करीत असलेल्या संस्थांना सहाय्यक अनुदान देणे इत्यादी कामे या संचालनालयाकडे आहेत. अधिक माहिती

ठळक घडामोडी

शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने दि. २० नोव्हेंबर, २०२३ पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धांसाठी हौशी नाट्य संस्थांकडून दिनांक २१ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर, २०२३ पर्यंत ऑनलाईन पध्दतीने प्रवेशिका मागविण्यात येत असल्याची माहिती श्री. बिभीषण चवरे, संचालक, सांस्कृतिक कार्य यांनी दिली. ६२ व्या हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी दिनांक २० नोव्हेंबर, २०२३ पासून महाराष्ट्र राज्यातील विविध १९ स्पर्धा केंद्रांवर आयोजित करण्यात येणार आहे. नोंदणीकृत हौशी नाट्य संस्थांना तसेच गतवर्षी राज्यनाटय स्पर्धेत सहभागी झालेल्या नाट्य संस्थांना स्पर्धेसाठी विहित नमुन्यातील प्रवेशिका, नियम संचालनालयाच्या https://mahanatyaspardha.com या वेबसाईटवर ऑनलाईन उपलब्ध होतील. आवश्यक त्या कागदपत्रासह प्रवेशिका दि. १५ सप्टेंबर, २०२३ पर्यंत ऑनलाईन सादर कराव्यात. विहित मुदतीनंतर कोणत्याही परिस्थितीत प्रवेशिका स्विकारल्या जाणार नाहीत. प्रवेशिकेसोबत आवश्यक असणारी कागदपत्रे जोडलेली नसल्यास किंवा संपूर्ण तपशिल भरला नसल्यास ऑनलाईन प्रवेशिका भरता येणार नाही. स्पर्धेसाठी संस्थेची निवड झाल्यानंतर संस्थेने शासनाने निश्चित केलेल्या केंद्रावर व दिलेल्या तारखेस प्रयोग सादर केला नाही, तर त्यांची प्रवेशिकेसोबत भरलेली अनामत रक्कम शासकीय कोषागारात जमा करण्यात येईल. नाट्यस्पर्धेकरीता संस्थांना शासन नियम बंधनकारक राहतील. नियमांचे उल्लंघन केल्यास संस्थेला अपात्र ठरविण्यात येईल. राज्यातील जास्तीत जास्त नाटय संस्थांनी महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन श्री. बिभीषण चवरे, संचालक, सांस्कृतिक कार्य यांनी केले आहे.


अंजुमन सैर ए गुलशन फरोशन, नवी दिल्ली या संस्थेमार्फत "फुल वालो की सैर" या महोत्सवाचे दिनांक 29 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर, 2023 या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात देशातील अनेक राज्य सांस्कृतिक कलापथक पाठवून आपल्या राज्याची कला सादर करीत असतात. या महोत्सवात महाराष्ट्र राज्यातर्फे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्याबाबत विनंती करण्यात आलेली आहे. या महोत्सवात दिनांक 4 नोव्हेंबर, 2023 रोजी नवी दिल्ली येथे महाराष्ट्राची लोककला आधारित सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्याबाबत प्रस्तावित आहे. तरी इच्छुक संस्थांनी या महोत्सवात लोककला वर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यासाठी दरपत्रक मागविण्यात येत आहे. संस्थांनी याबाबतचे दरपत्रक दिनांक 31 जुलै 2023 पर्यंत mahaculture@gmail.com या ई-मेल वर कार्यक्रमाची संकल्पना आणि अंदाजित रक्कम पाठवावी.


मान्यवर

श्री. एकनाथ शिंदे
मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
श्री. देवेंद्र फडणवीस
मा. उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
श्री अजित पवार
मा. उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
श्री. सुधीर मुनगंटीवार
मा. मंत्री, सांस्कृतिक कार्य विभाग
श्री. विकास खारगे
मा. प्रधान सचिव, सांस्कृतिक कार्य विभाग
श्री. बिभीषण चवरे
संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय

छायाचित्र दालन

  • महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळा २०२२
    ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार प्रदान सोहळा- आळंदी,पुणे
    संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेते सत्कार समारंभ
    महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळा २०२१