सांस्कृतिक कार्य संचालनालय

(०२२) २२८४ २६३४

      |  टेक्स्ट साईझ   

प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या नोंदणीकृत संस्थांना सहाय्यक अनुदान

अ.क्र. योजना सविस्तर माहिती
1) योजनेचे नाव : प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या नोंदणीकृत संस्थांना सहाय्यक अनुदान
2) योजने बद्दलचा शासन निर्णय : शासन निर्णय क्रमांक :प्रकक्षे/सहाअ 2012/प्र.क्र. 151/सां.का. 4 दिनांक 24 जुलै 2012 (सोबत जोडण्यात आला आहे)
3) योजनेचा उद्देश:
महाराष्ट्रात आज सांस्कृतिक संस्था तसेच इतर क्षेत्रात कार्य करणाऱ्या अनेक संस्था देखील संस्थेचे मुख्य कार्य सांभाळून सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करणे, कलेचे जतन व संवर्धन यासाठी कार्य करीत आहेत. महाराष्ट्रातील प्रयोगात्मक कला कला केवळ शासनामार्फत योजना राबवून टिकवून ठेवणे अभिप्रेत नसून खाजगी संस्थाद्वारे देखील याठी कार्य करणे आवश्यक आहे. ही बाब विचारात घेऊन ज्या खाजगी संस्था प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रात कार्य करीत आहेत त्यांना यासाठी प्रोत्साहन दयावे यास्तव त्याना या प्रयोजनासाठी सहाय्यक अनुदान देण्याच्या उद्देशाने प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या नोंदणीकृत संस्थांना सहाय्यक अनुदान देण्यात येते.
4) योजनेच्या प्रमुख अटी: 1) संस्था नोंदणी अधिनियम आणि सार्वजनिक विश्वस्त संस्था अधिनियम अंतर्गत नोंदणीकृत असली पाहिजे.
2) संस्थेच्या घटनेत सांस्कृतिक कार्य हा महत्वाचा उद्देश असावा.
3) सहाय्यक अनुदानाकरीता अर्ज करणारी संस्था किमान 3 वर्षापासून कार्यरत असावी.
4) संस्थेने मागील 3 आर्थिक वर्षात प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रात केलेले कार्य हे नि:शुल्क केलेले असणे आवश्यक आहे. तसेच त्याद्वारे कोणतेही उत्पन्न मिळविलेले नसावे.
5) संस्थेच्या दरवर्षीच्या हिशोबाची तपासणी धर्मदाय आयुक्तांनी मान्यता दिलेल्या किंवा संमत्ती दिलेल्या परिक्षकांकडून किंवा सनदी लेखापालाकडून (चार्टर्ड अकाऊटंट ) करण्यात यावी. मागील 3 आर्थिक वर्षाच्या लेखापरिक्षणाच्या अहवालाच्या प्रतींत खालील बाबी नमूद केलेल्या असणे आवश्यक आहे.
अ) नफा/तोटा पत्रक
ब) जमा व खर्च लेखे
क) ताळेबंद
ड) प्रयोगात्मक कलेवर केलेल्या खर्चाच्या बाबींचा तपशिल
इ) सनदी लेखापालांचे लेखा परिक्षणात्मक अहवाल
5) आवश्यक कागदपत्रे: 1) घटना व नियमावली
2) नोंदणी प्रमाणपत्र (धर्मदाय आयुक्त कार्यालय )
3) मागील तीन वर्षाचा लेखा परिक्षण अहवाल
4) मागील तीन वर्षात संस्थेने केलेल्या कार्यक्रमाचे पुरावे. (निमंत्रण पत्रीका, हॅन्ड बिल, वृत्तपत्रातील जाहिरात कात्रणे, स्मरणीका)
6) दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप: संस्थांनी अर्ज केल्यानंतर सदर अर्जाची छाणनी करुन नियमावलीतील निकषानुसार अनुदानासाठी पात्र ठरणाऱ्या संस्थांना अर्थसहाय्य समितीच्या मान्यतेने
क-50,000/-
ब-1,00,000/-
अ-2,00,000/-
जतन संवर्धन अंतर्गत- रु. 5,00,000/-
7) अर्ज करण्याची पद्धत : वृत्तपत्रात जाहिरात आल्यानंतर जाहिरातीत दिलेल्या मुदतीत विहीत नमून्यात आवश्यक कागदपत्रासह संस्थाकडून प्रस्ताव सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडे सादर केले जातात.
8) अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ: संस्थेने अर्ज केल्यानंतर छानणी समिती अर्जाची निकषानुसासर छाननी करुन पात्र झालेले अर्ज अर्थसहाय समितीपुढे ठेवले जातात. पहिल्या सहामाहीसाठी संस्थाना अनुदान देऊन निधी शिल्लक राहील्यास दुसऱ्या सहामाहीसाठी जाहिरात देऊन संस्थाकडून अर्ज मागविण्यात येत असतात.