सांस्कृतिक कार्य संचालनालय

(०२२) २२८४ २६३४

      |  टेक्स्ट साईझ   

भारतरत्न पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत क्षेत्रातील नोंदणीकृत संस्थांना सहायक अनुदान

या योजनेंतर्गत प्रायोगिक तत्त्वावर दरवर्षी प्रत्येक महसूली विभागामधील एक याप्रमाणे कमाल 6 शास्त्रीय संगीतातील नोंदणीकृत संस्थांना रुपये 2 लाख प्रतिसंस्था याप्रमाणे अनुदान देण्यात येते. संस्था निवडीसाठी पुढीलप्रमाणे निकष ठरविण्यात आले आहेत-

1) संस्था पूर्णत: शास्त्रीय संगीत क्षेत्रात कार्य करणारी असावी.
2) संस्था या क्षेत्रात किमान 10 वर्षे काम करणारी असावी.
3) संस्था शास्त्रीय संगीताचे विविध कार्यक्रम वर्षभर सादर करीत असावी.
4) संस्था शास्त्रीय संगीताच्या जतन व संवर्धनाचे काम करत असल्यास त्या संस्थेस अनुदानासाठी प्राधान्य देण्यात येईल.
5) संस्थांना मागील तीन आर्थिक वर्षाचे लेखापरिक्षण अहवाल दाखविणे आवश्यक आहे.
6) संस्थेस एकदा अनुदान मिळाल्यानंतर पुढील चार वर्षे सदर संस्था या अनुदानासाठी पात्र राहणार नाही.
7) संस्थेस अनुदान मिळाल्यानंतर तीन महिन्यांच्या आत उपयोगिता प्रमाणपत्र सादर न केल्यास पुढील शासकीय अनुदानासाठी कायमस्वरुपी अपात्र ठरविण्यात येईल.