सांस्कृतिक कार्य संचालनालय

(०२२) २२८४ २६३४

      |  टेक्स्ट साईझ   

रंगभवन खुले नाट्यगृह

रंगभवन खुले नाटयगृह हे सन १९५६ पासून सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या अखत्यारित आहे. रंगभवनच्या सभागृहाचे उद्घाटन दि. १४ ऑक्टोबर, १९५८ रोजी मा. मुख्यमंत्री श्री. यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाले. अगदी सुरुवातीला हे नाटयगृह लोककलेच्या कार्यक्रमांसाठी प्रसिद्ध होते. लोककलेबरोबरच या नाटयगृहात पं. रविशंकर , कथ्थक गुरू बिरजू महाराज, यांचेही कार्यक्रम झाले. याचबरोबर पं. हरिप्रसाद चौरसिया, उ. झाकीर हुसेन यांची जुगलबंदी तसेच नृत्यांगना हेमामालिनी, माधुरी दीक्षित यांचेही विलोभनीय कार्यक्रम संपन्न झाले. मोठमोठया पाश्चात्य जॅझ, रॉक कार्यक्रमांचेही या रंगमंचावर सादरीकरण झालेले आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे चित्रपट व नाट्य महोत्सव या कार्यक्रमांनीही रंगभवन खुले नाटयगृह गाजविलेले आहे. मा. उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आदेशानुसार रंगभवन शांतता क्षेत्रात मोडत असल्यामुळे सन २००३ पासून करमणुकींच्या कार्यक्रमांसाठी बंद आहे. रंगभवनच्या जागेवर बंदिस्त नाट्यगृह उभारण्याची बाब २०११ मध्ये विचाराधीन होती. त्याच प्रस्तावावर पुन्हा विचार व अंमलबजावणी तसेच हा प्रकल्प गतिमान करण्यासाठी सर्व उपाय योजनांबाबत कार्यवाही शासनस्तरावर सुरू आहे.