सांस्कृतिक कार्य संचालनालय

(०२२) २२८४ २६३४

      |  टेक्स्ट साईझ   

बालनाट्य प्रशिक्षण शिबीर

बालकांच्या व्यक्तिमत्वाचा विकास साधून ते संपन्न करण्याच्या दृष्टीने बालरंगभूमीचा फार उपयोग होतो. बालनाट्य कलाकारासाठी 20 दिवसांचे एक बालनाट्य प्रशिक्षण शिबिर आयोजित करुन त्यात बालरंगभूमीची मूलभूत तत्त्वे, बालमानसशास्त्र, बालकांसाठी नाटके लिहिण्याचे खास तंत्र इ. गोष्टींचे मार्गदर्शन करण्यात येते. तसेच बालनाट्य शिबिरात शिबिरार्थींकडून एक दिवसाचा बालनाट्य महोत्सव आयोजित करुन बालनाट्ये विद्यार्थ्यांना व जनतेला विनामूल्य दाखविण्यात येतात. महाराष्ट्रातील रंगभूमीस उत्तम रंगकर्मींची कमतरता भासू नये आणि लहान वयाच्या कलाकारांतील कलागुणांना उत्तेजन व प्रोत्साहन देऊन भावी काळात त्यांच्यामधील उत्तमोत्तम कलाकार निर्माण व्हावेत या उद्देशाने मराठी बालनाट्य शिबिराचे आयोजन करण्यात येते. यासाठी ८ ते १५ हि वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे.

नाट्यकला व इतर कलांचे प्रशिक्षण

केवळ मूळच्या प्रतिभेच्या आधारे कलाकार अत्युच्च शिखर गाठून ते सातत्याने टिकवू शकत नाही. अंगीकृत गुणांची शास्त्रशुध्द तालीम व सराव अत्याश्यक आहे. ही बाब व हिऱ्यालाही पैलू पडल्याशिवाय किंमत ठरत नाही. विचारात घेऊन प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्यात येते. ही शिबिरे निवासी स्वरुपाची असून तेथे राहण्याची आणि भोजन व्यवस्था शासनाकडून केली जाते.
या योजनेखाली प्रत्येकी २० दिवसांचे एक नाट्यप्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात येते. या योजनेतील प्रशिक्षणार्थी मुले १५ ते ३५ वर्षे व मुली १५ ते ३० वर्षे वयोमर्यादेतील असणे आवश्यक आहे.