सांस्कृतिक कार्य संचालनालय

(०२२) २२८४ २६३४

      |  टेक्स्ट साईझ   

सर्वोत्कृष्ट एकांकिका महोत्सव

सन २०१५ च्या पहिल्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात मा. मंत्री, सांस्कृतिक कार्य यांनी पारितोषिक प्राप्त एकांकिका महोत्सवाच्या रुपाने सर्वत्र पोहोचाव्यात या उद्देशाने पारितोषिक प्राप्त एकांकिका महोत्सव सन २०१५-१६ पासून सुरु करण्यात आला आहे. या एकांकिका महोत्सवास प्रेक्षकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. गतवर्षी या महोत्सवास लागून नाट्यप्राशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली.

पारितोषिक प्राप्त एकांकिका महोत्सव सहा महसुली विभागातील जिल्ह्यांत आयोजित करण्यात येतो. या महोत्सवामध्ये महाराष्ट्रातील नामांकित संस्थांद्वारे आयोजित करण्यात आलेल्या एकांकिका महोत्सवांतील (उदा.मृगजळ, आयएनटी, सकाळ, पुरुषोत्तम करंडक, सवाई इ.) एकांकिकांची निवड करुन सहा महसुली विभागातील प्रत्येकी एका जिल्ह्यात सहा एकांकिकांचे प्रत्येकी दोन दिवसांसाठी आयोजन करण्यात येते.

या महोत्सवातील सर्व एकांकिका प्रेक्षकांना विनामूल्य ठेवण्यात येतात. विशेषत: महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना या महोत्सवातील एकांकिकांचे प्रयोग पाहण्यासाठी प्राधान्य देण्यात येते. मागील दोन वर्षात खालील ठिकाणी सर्वोत्कृष्ट एकांकिका महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे.

अ.क्र.सन २०१५-१६ सन २०१६-१७
1 ठाणे रत्नागिरी
2 नाशिकअहमदनगर
3 औरंगाबादनांदेड
4 अकोलावर्धा
5 नागपूरअमरावती
6 पुणेसातारा

महाराष्ट्र राज्य नाटय महोत्सव

या महोत्सवात राज्य नाटय स्पर्धेत प्रथम आलेल्या नाटकांचा महोत्सव तसेच या महोत्सवाला लागूनच राज्यस्तरीय पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात येते. या महोत्सवात हौशी मराठी, हिंदी, संगीत, संस्कृत, बालनाट्य आणि व्यावसायिक नाट्य स्पर्धेत प्रथम आलेल्या नाटकांचा महोत्सव आयोजित करण्यात येतो. व्यावसायिक नाटक वगळता इतर सर्व नाटकांना रसिक प्रेक्षकांना प्रवेश विनामूल्य ठेवण्यात येतो.