सांस्कृतिक कार्य संचालनालय

(०२२) २२८४ २६३४

      |  टेक्स्ट साईझ   

राज्य सांस्कृतिक पुरस्कार

सांस्कृतिक क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या कलावंत व्यक्तींना राज्य सांस्कृतिक पुरस्काराने सन्मानित करणे हे या पुरस्काराचे उद्दिष्ट आहे. राज्य शासनातर्फे प्रतिवर्षी राज्य सांस्कृतिक पुरस्कार खालील बारा कला क्षेत्रात दिले जातात-
१) नाटक
२) कंठसंगीत
३) उपशास्त्रीय संगीत
४) वाद्यसंगीत
५) मराठी चित्रपट
६) कीर्तन / समाजप्रबोधन
७) तमाशा
८) शाहिरी
९) नृत्य
१०) लोककला
११) आदिवासी गिरीजन
१२) कलादान

या कला क्षेत्रांमध्ये ज्या कलाकारांनी कलाक्षेत्रात प्रदीर्घकाळ एकनिष्ठेने उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. ज्यांचे वय ५० वर्षापेक्षा अधिक पुरुष कलाकारांसाठी व ४० वर्षापेक्षा जास्त वय स्त्री कलाकार अशा ज्येष्ठ मान्यवर कलाकारांची पुरस्कारांसाठी निवड मा. मंत्री सांस्कृतिक कार्य यांच्या अध्यक्षतेखाली गठित करण्यात आलेल्या पुरस्कार समितीमार्फत करण्यात येते.

1) पुरस्कार स्वरुप
2) रुपये १.०० लाख (रुपये एक लाख)
3) शाल
4. सन्मानचिन्ह


खालील मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे - १९७६ ते २०२० पर्यंतची यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा

भारतरत्न पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार

शास्त्रीय संगीतास प्रोत्साहन देण्यासाठी भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या नावे सन २०१२-१३ पासून विविध योजना सुरु करण्यात आल्या आहेत. यापैकी भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या नावे शास्त्रीय संगीत (शास्त्रीय गायन व वादन) या क्षेत्रात प्रदीर्घ काळ उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कलावंतास जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.

1. मा. मंत्री (सांस्कृतिक कार्य) अध्यक्ष
2. मा. राज्यमंत्री, सांस्कृतिक कार्य उपाध्यक्ष
3. मा. प्रधान सचिव (सांस्कृतिक कार्य) सदस्य
4.संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई सदस्य सचिव
. .
1.

डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे

अशासकीय सदस्य
2.

पं. उद्धव आपेगावकर

अशासकीय सदस्य
3.

श्री श्रीनिवास जोशी

अशासकीय सदस्य
4.

डॉ. राम देशपांडे

अशासकीय सदस्य
5.

श्री फैयाज हुसेन खाँसाहेब

अशासकीय सदस्य

पुरस्काराचे स्वरुप :


1) रु. 5.00 लक्ष रोख
2) मानपत्र
3) सन्मानचिन्ह
4) शाल

यापूर्वी भारतरत्न पं. भीमसेन जोशी जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आलेले मान्यवर

1)
श्रीमती किशोरी आमोणकर
2012
2)
पं. जसराज
2013
3)
श्रीमती प्रभा अत्रे
2014
4)
पं.राम नारायण
2015
5)
श्रीमती परवीन सुलताना
2016
6)
श्रीमती माणिक भिडे
2017
7)
पं. केशव गिंडे
20186
8)
पं.अरविंद परीख
2019
9)
श्रीमती एन राजम (घोषित)
2020

गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या नावे सन 1993 पासून संगीत/गायन क्षेत्रातील मान्यवर व्यक्तीस पुरस्कार प्रदान करण्यात येतो. याकरिता शासन मान्य समिती आहे.
पुरस्काराचे स्वरुप
1) रु.5 लक्ष रोख
2) मानपत्र
3) शाल
4) सन्मानचिन्ह असे आहे.

1) संक्षिप्त शिर्षक आणि व्याप्ती :- महाराष्ट्रातील गायन/संगीत या कलाक्षेत्रात प्रदीर्घ काळ उल्लेखनीय कार्य केलेल्या कलाकारांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार देऊन गौरव करणे व त्याद्वारे कलाक्षेत्राच्या विकासाला उत्तेजन देणे ही या पुरस्काराची उद्दिष्टे आहेत. राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारांची संख्या कमी असल्यामुळे महाराष्ट्रातील इतर अनेक कलावतांची पात्रता असूनही राष्ट्रीय पुरस्कारापासून वंचित राहावे लागते. त्यामुळे अशा कलाकारांना सदर पुरस्कारासाठी विचार करण्यात येतो.

2) पुरस्काराचे स्वरुप :- पुरस्कारात खालील गोष्टींचा समावेश आहे-
   अ) रुपये 5 लक्ष रोख
   ब) शाल
   क) सन्मानचिन्ह
   ड) मानपत्र

3) पुरस्काराचे क्षेत्र :- गायन व संगीत कलेच्या क्षेत्रात फक्त एका ज्येष्ठ कलाकार व्यक्तीची या पुरस्कारासाठी निवड करण्यात येते.

4) पुरस्कारासाठी पात्रता :-
अ) जे संगीत व गायन क्षेत्रात चिकाटीने/एकनिष्ठेने सातत्याने प्रदिर्घ काळ काम करीत आहेत अशा ज्येष्ठ, ख्यातनाम आणि राज्याला गौरव प्राप्त करुन देणारा कलाकार पुरस्कारासाठी पात्र आहे.
ब) असा कलाकार सध्या प्रकाशझोतात नसला तरी कार्यरत असणारा असावा.
क) कलाकाराची त्याच्या कलाक्षेत्रातील कर्तृत्वाची जेष्ठता सिध्द असावी.
ड) पुरुष कलाकार 50 वर्ष व स्त्री कलाकार 40 वर्षे यापेक्षा कमी वयाचा नसावा.
इ) कलाकार महाराष्ट्र राज्यातील किमान 15 वर्षे रहिवाशी असला पाहिजे. केवळ जन्मत: महाराष्ट्रीय कलाकारांचाच विचार मर्यादित न ठेवता ज्या इतर प्रांतीय कलाकारांनी महाराष्ट्रात स्थानिक होऊन एकनिष्ठेने गायन व संगीत कलेची सेवा केली आहे अशांचाही विचार केला जातो.

5) निवड व निर्णय समिती :-

1. मा. मंत्री (सांस्कृतिक कार्य) अध्यक्ष
2. मा. राज्यमंत्री, सांस्कृतिक कार्य उपाध्यक्ष
3. मा. प्रधान सचिव (सांस्कृतिक कार्य) सदस्य
4.संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई सदस्य सचिव

तसेच या क्षेत्रातील 5 तज्ञ व्यक्तींची अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात येते.

यापूर्वी खालील मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आहेत-
अ.क्र. वर्ष पुरस्कारार्थीचे नाव
1 1992 श्रीमती माणिक वर्मा
2 1993 श्री. श्रीनिवास खळे
3 1994 श्री. गजानन वाटवे
4 1995 श्री. दत्ता डावजेकर
5 1996 पंडित जितेंद्र अभिषेकी
6 1997 पंडित ह्रदयनाथ मंगेशकर
7 1998 श्रीमती ज्योत्स्ना भोळे
8 1999 श्रीमती आशा भोसले
9 2000 श्री. अनिल विश्वास
10 2001 श्री. सुधीर फडके
11 2002 श्री. रवींद्र जैन
12 2003 श्री. प्यारेलाल शर्मा
13 2004 श्री. मन्ना डे
14 2005 श्री. स्नेहल भाटकर
15 2006 श्रीमती जयमाला शिलेदार
16 2007 श्री. खय्याम
17 2008 श्री. महेंद्र कपूर
18 2009 श्रीमती सुमन कल्याणपूर
19 2010 श्रीमती सुलोचना चव्हाण
20 2011 श्री. यशवंत देव
21 2012 पदमश्री आनंदजी शहा
22 2013 श्री. अशोक पत्की
23 2014 श्रीमती कृष्णा कल्ले
24 2015 श्री. प्रभाकर जोग
25 2016 श्री. उत्तम ब्रिदपाल सिंग
26 2017 श्रीमती पुष्पा पागधरे
27 2018 राम लक्ष्मण उर्फ श्री. विजय पाटील
28 2019 श्रीमती उषा खन्ना
29 2020 श्रीमती उषा मंगेशकर