सांस्कृतिक कार्य संचालनालय

(०२२) २२८४ २६३४

      |  टेक्स्ट साईझ   

नवीन संदेश

सांस्कृतिक कार्य संचालनालय या कार्यालयातील CCTV यंत्रणा देखभाल/दुरुस्ती साठी सेवा पुरवठादार यांच्याकडून दिनांक 01 नोव्हेंबर 2022 ते 11 नोव्हेंबर 2022 या कालावधीसाठी देखभाल/दुरूस्तीसाठी दरपत्रके मागविण्यात येत आहेत.
तरी इच्छुक कंपन्या, व्यक्ती यांनी आपले दर नमुन्याबंद लिफाफ्यात दिनांक 01 नोव्हेंबर 2022 ते 11 नोव्हेंबर 2022 पर्यंत कार्यालयीन वेळेत या कार्यालयात सादर करावेत. कार्यालयीन वेळेनंतर प्राप्त झालेली दरपत्रके स्वीकारली जाणार नाहीत. सर्व दरपत्रकातील दर भरताना सर्व कर अंतर्भूत करुन दर भरण्यात यावेत.

सांस्कृतिक कार्य संचालनालय या कार्यालयातील बायोमॅट्रिक मशीन देखभाल/दुरुस्ती साठी सेवा पुरवठादार यांच्याकडून सोबत जोडलेल्या नमुना सूचनापत्र अटी व शर्तीच्या अधीन राहून दिनांक 1 ते 11 नोव्हेंबर, 2022 या कालावधीसाठी देखभाल/दुरूस्तीसाठी दरपत्रके मागविण्यात येत आहेत. तरी इच्छुक कंपन्या, व्यक्ती यांनी आपले दर नमुन्याबंद लिफाफ्यात दिनांक 1 ते 11 नोव्हेंबर, 2022 पर्यंत कार्यालयीन वेळेत या कार्यालयात सादर करावेत. कार्यालयीन वेळेनंतर प्राप्त झालेली दरपत्रके स्वीकारली जाणार नाहीत. सर्व दरपत्रकातील दर भरताना सर्व कर अंतर्भूत करुन दर भरण्यात यावेत.

सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई हे रंगभवन खुले नाट्यगृह, धोबीतलाव मुंबई या हेरिटेज वास्तू विशारदेच्या अनुषंगाने तांत्रिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या हेरिटेज वास्तू विशारद संस्थांकडून तांत्रिक माहितीकरीता सल्लगार नेमण्याबाबत खालीलप्रमाणे दरपत्रके मागविण्यात येत आहेत रंगभवन नाट्यगृहाच्या प्रस्तावित कामाचे स्वरूप खालील तक्त्यात नमूद करण्यात आलेले आहे.

कामाचे स्वरूप
ठिकाण: रंगभवन खुले नाट्यगृह, धोबीतलाव, मुंबई
Conservation, Preservation and Comprehensive Management Plan Of Rangbhavan,
1. Conservation and repair to existence structure as per Heritage norms of MCGM
2. Repairs, Redesigning of an ampheater seating arrangement as per Heritage norms.
3. Creation of eco Sound barrier/Cutter/absorbers at Rangbhavan subject to Hon. High Court order.
4. Area management, adoptive reuse and long term management plan designing.
तरी इच्छुक संस्था, व्यक्ती यांनी आपले दर सीलबंद लिफाफ्यात दिनांक 12 ते 20 ऑक्टोंबर, 2022 पर्यंत कार्यालयीन वेळेत या कार्यालयात सादर करावेत. कार्यालयीन वेळेनंतर प्राप्त झालेली दरपत्रके स्वीकारली जाणार नाहीत. दरपत्रकातील दर भरताना सर्व कर अंतर्भूत करुन दर भरण्यात यावेत.
पात्रता: हेरिटेज वास्तू बाबत विशेष तांत्रिक क्षमता/ज्ञान असणाऱ्या व अशा प्रकारच्या कामाचा अनुभव असणाऱ्या संस्था/व्यक्ती यासाठी पात्र ठरतील. याबाबतचे पात्रता निश्चितीचे अंतिम अधिकार खाली सही करणारे यांना राहतील. प्राप्त दरपत्रके कोणत्याही कारणाशिवाय स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा संपूर्ण अधिकार मा.संचालक, सांस्कृतिक कार्य यांचेकडे राखून ठेवण्यात येत आहे. याबाबतची अधिक माहिती DCA मध्ये पहावयास मिळेल.

सांस्कृतिक कार्य सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई या कार्यालयातील २4 संगणक व 6 प्रिंटर यांच्या देखभाल व दुरुस्ती व तद्नुषंगिक वस्तु व त्यांच्या दरपत्रके मागविणेसाठी वार्षिक कंत्राट (AMC) करणे आहे. यासोबत जोडण्यात आलेल्या अटी व शर्तीनुसार या कार्यालयातील संगणक व पिंटर्स देखभाल व दुरुस्तीसाठी वार्षिक कंत्राट घेण्यास इच्छुक पुरवठाधारकांनी सदरील कामासाठीचे दरपत्रक बंद लिफाफ्यामध्ये सदर जाहिर निवेदन प्रसिध्द झाल्याचे तारखेपासून दिनांक 14 ऑक्टोंबर, २०२२ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत अटी व शर्तींमध्ये नमूद केलेल्या सर्व कागदपत्रा सांस्कृतिक कार्य संचालनालय, पहिला मजला, जुने सचिवालय, महात्मा गांधी मार्ग, मुंबई ४०० ०३२ येथे पाठवाव्यात किंवा प्रत्यक्ष जमा करावीत. मुदतीनंतर आलेली दरपत्रके स्विकारण्यात येणार नाहीत, याची कृपया नोंद घ्यावी.

६१ वी महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धा, प्रवेशिका

१९ वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा व दिव्यांग बालनाट्य स्पर्धा, प्रवेशिका

सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई या कार्यालयातील तसेच रंगभवन खुले नाट्यगृह, धोबीतलाव, मुंबई येथील अभिलेख्यावर वाळवी, उंदीर व मच्छर प्रतिबंधात्मक औषध फवारणी करण्याबाबतचे दरपत्रक मागविण्यात येत आहेत. इच्छुक पुरवठादारांनी दि. 24 ऑगस्ट, 2022 रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत (शासकीय सुट्टया सोडून) मोहोरबंद लिफाप्यात संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, पहिला मजला, जुने सचिवालय, महात्मा गांधी मार्ग, मुंबई ४०० ०३२ येथे पाठवाव्यात किंवा प्रत्यक्ष जमा करावीत. मुदतीनंतर आलेली दरपत्रके स्विकारण्यात येणार नाहीत, याची कृपया नोंद घ्यावी.

छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतीशताब्दी वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत वर्षभर वेगवेगळया कार्यक्रमांचे आयोजन करणे प्रस्तावित आहे. राजर्षी छत्रपती यांचे कार्य संपूर्ण महाराष्ट्रभर तरुण पिढीला माहित व्हावे हा या मागील मुख्य उददेश आहे.
शाहू महाराजांचे समता मुलक कार्य, आर्थिक क्षेत्रातील योगदान, कला व संस्कृती विषयक भरीव कामगिरी, शेतकऱ्यांसाठीचे योगदान आरक्षण, शिक्षण क्षेत्र व वसतिगृहे विषयक क्रांतीकारक निर्णय, क्रांतिकारकांना केलेली मदत, पत्रकारितेमधील योगदान तसेच वेगवेगळया व्यक्तीमत्वांना केलेली मदत या सर्व बाबी नवीन पिढीच्या समोर आणने आवश्यक आहे.
शाहू महाराज यांच्या जीवन कार्यावर आधारित एका भव्य माहितीपटाची निर्मिती करण्याचे प्रस्तावित आहे. शाहू महाराजांनी घेतलेले वेगवेगळे निर्णय, भूमिका यांची कारणमीमांसा या माहितीपटातून करण्यात येईल. शाहू महाराजांचे सामाजिक समता व बंधुता या बाबतचे विचार आणि कृती या माहितीपटातून उलगडून दाखविण्यात येईल. छायाचित्रे, चलचित्रे, दैनिकातील कात्रणे, पत्रव्यवहार यामधून शाहूंचे कार्य माहितीपटातून दाखविण्या करिता माहितीपटाच्या निर्मितीकरीता पुढील बाबींवरील कामासाठी इच्छूक ठेकेदारांकडून दरपत्रके दि.22 जुलै 2022 ते दि.2 ऑगस्ट 2022 या कालावधीत मागविण्यात येत आहे.1 ) दिग्दर्शन, निर्मिती, 2) संगित योजना, 3) छायाचित्रीकरण, 4) संकलन, मिक्सींग, नेपथ्य आदि कामांसाठी दि.2 ऑगस्ट 2022 पर्यंत या कार्यालयाच्या पत्त्यावर सदरहू दरपत्रके सायं.5.00 वाजेपर्यंत स्विकारण्यात येतील.

भारतरत्न पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत क्षेत्रातील नोंदणीकृत संस्थांना सहाय्यक अनुदान

भारतरत्न पं. भीमसेन जोशी युवा शिष्यवृत्ती योजना

आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत राज्यात विविध ठिकाणी ड्रोनमार्फत Light & Sound Show चे आयोजन प्रस्तावित आहे. अशा कार्यक्रमाचा आयोजनासाठी अनुभव असलेल्या किंवा अशा कार्यक्रमाचे प्रारूप करण्याचा अनुभव असणाऱ्या संस्था यांच्याकडून दिनांक ७.०६.२०२२ ते १३.५.२०२२ दरम्यान दरपत्रके मागविण्यात येत आहेत. यासाठी अनुभवी TECHNICAL CONSULTANT यांनी अर्ज करावेत. अटी व शर्ती सांस्कृतिक कार्य संचालनालय जुने सचिवालय काला घोडा जवळ फोर्ट मुंबई 32 येथे कार्यालयीन वेळेत प्राप्त होतील.

प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या नोंदणीकृत संस्थांना सहाय्यक अनुदान

आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत गेट वे ऑफ इंडिया या ऐतिहासिक वास्तूवर SOUND LIGHT PROJECTIONS साठी दिनांक 20.05.2022 ते 26.05.2022 दरम्यान कोटेशन मागविण्यात येत आहेत. अनुभवी TECHNICAL CONSULTANT यांनी अर्ज करावेत. अटी व शर्ती सांस्कृतिक कार्य संचालनालय जुने सचिवालय काला घोडा जवळ फोर्ट मुंबई 32 येथे कार्यालयीन वेळेत प्राप्त होतील.

मा.वृद्ध साहित्यिक व कलाकार इत्यादींना मानधन योजना मुंबई शहर व मुंबई उपनगर मधील कलावंताकडून अर्ज मागविणेबाबत

मान्यवर वृद्ध साहित्यिक व कलावंत यांना मानधन योजना

आझादी का अमृत महोत्सव उपक्रमांतर्गत दिनांक 17 ते 23 डिसेंबर 2021 या कालावधीत रिव्हर ऑफ इंडिया या महोत्सवाचे केंद्र शासनाच्या वतीने देशभर आयोजन करण्यात येत आहे. नदी महोत्सवांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने सूरसरिता या सांस्कृतिक कार्यक्रमाचे मंगळवार दिनांक 21 डिसेंबर 2021 रोजी आयोजन केले आहे. स्थळ- मिनी थिएटर, पु.ल. देशपांडे, महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी, दादर, मुंबई

कोरोना पार्श्वभूमीवर कलाकारांना अर्थसहाय्य देणेबाबत.

६० वी महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धा प्रवेशिका मुदतवाढ

१८ वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा व दिव्यांग बालनाट्य स्पर्धा प्रवेशिका मुदतवाढ

५७ वा राज्य मराठी चित्रपट महोत्सव प्रवेशिका

व्यावसायिक नाट्य स्पर्धा प्रवेशिका

मान्यवर कलाकार मानधन योजनेंतंर्गत अर्ज करण्याची मुदत ३१ जानेवारी पर्यंत

भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांना सहायक अनुदान

महाराष्ट्र राज्य बालनाट्य व दिव्यांग बालनाट्य स्पर्धा प्रवेशिका

५९ वी राज्य नाट्य स्पर्धा प्रवेशिका २०१९-२०

भारतरत्न पं. भीमसेन जोशी युवा शिष्यवृत्ती योजना

शास्त्रीय व लोककला क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांची नोंदणी

पु ल देशपांडे जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने स्टँड अप कॉमेडी स्पर्धा अटी व नियम

३१ वी मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धा प्रवेशिका

पु. ल. देशपांडे, ग. दि. माडगूळकर आणि सुधीर फडके यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कार्यशाळा-लातूर

राज्य नाट्य स्पर्धा प्रवेशिका

ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार जाहीर आवेदन - सांस्कृतिक कार्यक्रम

भारतरत्न पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत क्षेत्रातील नोंदणीकृत संस्थांना सहाय्यक अनुदान

.