सांस्कृतिक कार्य संचालनालय

(०२२) २२८४ २६३४

      |  टेक्स्ट साईझ   

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवास अनुदान

आंतरराष्ट्रीय स्तरावरील चांगल्या दर्जाचे चित्रपट सर्वांना पहाता यावेत म्हणून आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात येणा-या संस्थांना शासन सहाय्यक अनुदान मंजूर करते. अशा प्रकारच्या चित्रपट महोत्सवांसाठी निधीची मागणी विविध संस्थांकडून होत असते. प्रतिवर्षी या महोत्सवाचे आयोजन करण्यासाठी अनेक संस्थाकडून अर्थसहाय्याची मागणी होत असते. या संस्थांना आतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या आयोजनासाठी प्रथम मागणी येणाऱ्या 10 संस्थांना रुपये 5.00 लक्ष इतके अनुदान मंजूर करण्यात येते.

महाराष्ट्रातील ऐतिहासिक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्वपूर्ण व्यक्तींच्या जीवनावर आधारित मराठी चित्रपटांना सहायक अनुदान

सामाजिक ऐतिहासिक महत्त्वाच्या व्यक्तिंच्या जीवनावर आधारित चित्रपट निर्माण करणाऱ्या चित्रपट निर्मात्याला शासनाकडून रुपये 50 लक्ष इतके अर्थसहाय देण्यात येते.

महान व्यक्तिंच्या जीवनावर चित्रपट निर्मितीसाठी विषय/व्यक्तींची निवड राज्यस्तरीय समिती करते. निवडलेल्या विषयावर चित्रपट निर्मितीस इच्छूक निर्मात्यांकडून अर्ज मागविण्यासाठी संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय जाहिरात देते. प्राप्त विहीत अर्जांची छाननी चित्रपट परिक्षण समिती करते. परिक्षणाअंती योग्य निर्मात्याची शिफारस समिती करते. या शिफारशीनुसार राज्यस्तरीय समिती निर्माता निवडते व त्या निर्मात्यास दोन वर्षाच्या कालावधीत चित्रपट निर्मिती पूर्ण करण्यासाठी एकूण रु.50 लक्ष इतके अनुदान तीन हप्त्यात मंजूर केले जाते.