सांस्कृतिक कार्य संचालनालय

(०२२) २२८४ २६३४

      |  टेक्स्ट साईझ   

तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावंकर जीवन गौरव पुरस्कार

तमाशा क्षेत्रात विठाबाई नारायणगावंकर यांनी केलेली प्रदीर्घ सेवा विचारात घेता त्यांच्या नावे तमाशा क्षेत्रात प्रदीर्घ सेवा केलेल्या जेष्ठ कलाकारास जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्याची योजना शासनामार्फत सन २००५ पासून राबविण्यात येते.

या पुरस्कारासाठी पुरस्कारार्थींची निवड करण्यासाठी निवड समितिची बैठक आयोजित करण्यात येते. शासन निर्णय दि.९ नोव्हेंबर २०१५ या शासन निर्णयान्वये समिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती खालीलप्रमाणे आहे.

1. मा. मंत्री (सांस्कृतिक कार्य) अध्यक्ष
2. मा. राज्यमंत्री, सांस्कृतिक कार्य उपाध्यक्ष
3. मा. प्रधान सचिव (सांस्कृतिक कार्य) सदस्य
4.संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई सदस्य सचिव

या समितीने पुरस्कारार्थींची निवड केल्यानंतर राज्य ढोलकीफड तमाशा महोत्सवात हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. पुरस्काराचे स्वरुप:-
1) रुपये ५ लाख,
2) सन्मानचिन्ह,
3) मानपत्र
4) शाल
सन २०१५-१६ या वर्षासाठीचा पुरस्कार दि. २१ मार्च २०१७ रोजी वाशी, नवी मुंबई येथे श्रीमती राधाबाई खोडे- नाशिककर यांना प्रदान करण्यात आला.

तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर जीवनगौरव पुरस्कार प्राप्त मान्यवर


1. श्रीमती कांताबाई सातारकर 2005-06
2. श्री वसंत अवसरीकर 2006-07
3. श्रीमती सुलोचना नलावडे 2007-08
4.श्री हरिभाऊ बडे2008-09
5.श्रीमती मंगला बनसोडे 2009-10
6.श्री साधु रामा पाटसुते 2010-11
7.श्री अंकुश संभाजी खाडे ऊर्फ बाळू 2011-12
8.श्रीमती प्रभा शिवणेकर 2012-13
9.श्री भिमराव तोताराम गोपाळ 2013-14
10.श्री गंगारामबुवा कवठेकर 2014-15
11.श्रीमती राधाबाई खोडे नाशिककर 2015-16
12.श्री मधुकर नेराळे 2016-17
13.श्री बशीर कमरुददीन मोमीन 2017-18
14.श्रीमती गुलाबबाई संगमनेरकर 2018-19