सांस्कृतिक कार्य संचालनालय

(०२२) २२८४ २६३४

      |  टेक्स्ट साईझ   

लोककलावंतांच्या कलापथकांना अनुदान पॅकेज योजना

महाराष्ट्राच्या सर्व लोककला टिकून राहाव्यात, या लोककलेचा वारसा जतन व संवर्धन  करण्यासाठी या लोककलांना उत्तेजन देण्याच्या हेतूने राज्याच्या कानाकोप-यात विशेषत: ग्रामीण भागात तमाशा, लावणी, दशावतार, खडीगंमत, शाहिरी इत्यादीसारख्या कला सादर करणा-या लोककलांच्या कलापथकांना महाराष्ट्र शासनाने भांडवली अनुदान व प्रयोग अनुदान पॅकेज योजना सन 2008-09 मध्ये सुरु केली आहे. प्रतिवर्षी प्राप्त होणाऱ्या अर्जांच्या संख्येनुसार खालील मर्यादेत कलापथकांना भांडवली व प्रयोग अनुदान मंजूर करण्यात येते.

भांडवली अनुदान:-

अ.क्र.कलापथकअनुदानाची रक्कम कलापथकांची कमाल संख्याएकूण अनुदान
1.पूर्णवेळ तमाशा 2,00,000/- 10 20,00,000/-
2. हंगामी तमाशा/दशावतार 1,00,000/- 10 10,00,000/-
3.खडीगंमत/शाहिरी 50,000/- 20 10,00,000/-
4.संगीतबारी 25,000/- 40 10,00,000/-
एकूण 80 50,00,000/-

प्रयोग अनुदान:-

अ.क्र.कलापथक/ कला प्रकारप्रत्येक प्रयोगासाठी अनुदान जास्तीत जास्त प्रयोग संख्याप्रत्येक कलापथकास मिळणारी रक्कम कलापथकांची कमाल संख्या कला प्रकारवार एकूण खर्च
1.पूर्णवेळ ढोलकी फड/तमाशा फड 30,000/- 20 6,00,000/- 10 60,00,000/-
2. हंगामी तमाशा फड आणि दशावतार मंडळे 15,000/- 20 3,00,000/- 10 1,20,000/-
3. खडी गंमत कला पथके आणि शाहिरी पथके/ लावणी कला पथके (संगीत बारी) 7,000/- 20 1,40,000/- 30 42,00,000/-
एकूण 80 2,22,00,000/-