सांस्कृतिक कार्य संचालनालय

(०२२) २२८४ २६३४

      |  टेक्स्ट साईझ   

वृद्ध कलाकार मानधन योजना

योजनेचे स्वरूप:-

सदर योजना सन 1954-55 पासून राबविण्यात येत आहे. कालानुरूप आवश्यकते बदल करणे व योजनेच्या सर्व नियमामध्ये सुसुत्रता आणणे यासाठी पूर्वीचे सर्व शासन निर्णय अधिक्रमित करून सर्वसमावेशक सुधारीत नियमावली दिनांक 7 फेब्रुवारी 2014 च्या शासन निर्णयान्वये तयार करण्यात आली आहे.

योजनेच्या अटी व शर्ती:-

1. वृद्ध साहित्यिक/कलावंत यांनी जिल्हास्तरावर समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद अथवा तालुका स्तवरावर गट विकास अधिकारी यांच्याकडे या योजनेंर्गंत मानधन मिळण्यासाठी अर्ज करणे आवश्यक आहे.
2. प्राप्त अर्जांची जिल्हा परिषदेमार्फत खालील निकषांच्या आधारे छाननी करण्यात येईल.
अ) साहित्य व कला या क्षेत्रात ज्यांनी मोलाची भर घातली आहे अशी व्यक्ती,
आ) कला आणि वाङ्मय क्षेत्रात ज्यांनी किमान 15 ते 20 वर्षे इतक्या प्रदीर्घ काळासाठी महत्वपूर्ण कामगिरी केली आहे. अशा व्यक्ती,
इ) ज्या स्त्री/पुरूष कलाकाराचे व साहित्यिकांचे वय 50 वर्षापेक्षा जास्त आहे. अशा व्यक्ती,
ई) जे साहित्यिक व कलावंत अर्धांगवायू, क्षय, कर्करोग, कुष्टरोग या रोगांनी आजारी असतील तसेच ज्यांना 40 % पेक्षा जास्त शारिरिक व्यंग असेल किंवा अपघाताने 40 % पेक्षा जास्त अपंगत्व आले असेल व त्यामुळे ते स्वत:चा व्यवसाय करू शकत नसती, असे साहित्यिक व कलावंत यांच्यासाठी वयाची अट शिथिल करण्यात येईल.
उ) वयाने वडील असणाऱ्या व विधवा /परितक्त्या वृद्ध साहित्यिक व कलावंत यांना मानधन देण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल.
ऊ) ज्या साहित्यिक व कलावंतांचे सर्व मार्गाने मिळून वार्षिक उत्पन्न रू. 48, 000/- पेक्षा जास्त नाही.
3. छाननीअंती योजनेच्या निकषानुसार पात्र ठरणारे अर्ज जिल्हास्तरीय निवड समितीच्या मान्यतेस्तव सादर करण्यात येतील.
4. जिल्हास्तरीय निवड समिती पात्र अर्जातून प्रतिवर्षी इष्टांकाच्या मर्यादेत 60 लाभार्थ्यांची मानधनासाठी निवड करू शकेल. निवड झालेल्या लाभार्थ्यांना तहह्यात मानधन अदा करण्यात येईल.
5. निवड करण्यात आलेल्या लाभार्थ्यांना शासन निर्णय क्र. वृकमा 2013/प्र.क्र. 40/सां.का. 4 दिनांक 22.8.2014 अन्वये सुधारित दराने खालीलप्रमाणे मानधन अदा करण्यात येते.

अ.क्र. कलावंतांची वर्गवारी वर्गीकरण संख्या
मानधनाची रक्कम (रूपये )
प्रतिमाह वार्षिक
1) राष्ट्रीय कलावंत अ वर्ग 448
2,100/- 25,200/-
2) राज्यस्तरीय कलावंत ब वर्ग 820
1,800/- 21,600/-
3) स्थानिक कलावंत क वर्ग 25882
1,500/- 18,000/-
एकूण- 27150