सांस्कृतिक कार्य संचालनालय

(०२२) २२८४ २६३४

      |  टेक्स्ट साईझ   

नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार

1) संक्षिप्त शिर्षक आणि व्याप्ती -


रंगभूमीची प्रदीर्घ सेवा केलेल्या ज्येष्ठ नाट्य कलाकारास दरवर्षी रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार एका कलाकारास देऊन गौरविण्यात येते. राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारांची संख्या कमी असल्यामुळे महाराष्ट्रातील इतर अनेक कलावंतांची पात्रता असूनही राष्ट्रीय पुरस्कारापासून वंचित रहावे लागते. त्यामुळे अशा कलाकारांचा सदर पुरस्कारासाठी विचार करण्यात येतो.

2) पुरस्काराचे स्वरुप -


अ) रुपये 5.00 लाख
ब) शाल
क) सन्मानचिन्ह
ड) मानपत्र

3) पुरस्कारासाठी पात्रता -


अ) नाट्य क्षेत्रात चिकाटीने एकनिष्ठेने सातत्याने प्रदीर्घ काम केलेल्या ज्येष्ठ रंगभूमी कलाकार पुरस्कारासाठी पात्र आहे.

ब) कलाकाराची त्यांच्या कलाक्षेत्रातील कर्तृत्वाची ज्येष्ठता सिद्ध असावी.

4) निवड समिती -

1. मा. मंत्री (सांस्कृतिक कार्य) अध्यक्ष
2. मा. राज्यमंत्री, सांस्कृतिक कार्य उपाध्यक्ष
3. मा. सचिव, पर्यटन व सांस्कृतिक कार्य सदस्य
4. संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय सदस्य सचिव
. .
अशासकीय सदस्य :-
1. मा. अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मुंबई अशासकीय सदस्य
2. मा. संमेलनाध्यक्ष, अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन अशासकीय सदस्य
3. श्री. उल्हास पवार अशासकीय सदस्यव
4. श्री. वामन केंद्रे अशासकीय सदस्य
5. श्रीमती बकुळ पंडित अशासकीय सदस्य
6. श्रीमती नीलाक्षी पेंढारकर अशासकीय सदस्य

नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार यापूर्वी खालील मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे-


अ.क्र.पुरस्कारार्थीचे नाववर्ष
1. मा. प्रभाकर पणशीकर, मुंबई २००६-०७
2. मा.श्रीमती विजया मेहता, मुंबई २००७-०८
3. मा.श्री. भालचंद्र पेंढारकर, मुंबई २००८-०९
4. मा.प्रा. मधुकर तोरडमल, मुंबई २००९-१०
5. मा.श्रीमती सुलभा देशपांडे, मुंबई २०१०-११
6. मा. श्रीमती सुधा करमरकर, मुंबई २०११-१२
7. मा. श्री. आत्माराम भेंडे, मुंबई २०१२-१३
8. मा. श्री. अरुण काकडे, मुंबई २०१३-१४
9. मा. श्री. श्रीकांत मोघे, पुणे २०१४-१५
10. मा. श्री. रामकृष्ण नायक, मुंबई २०१५-१६
11. मा. श्री. लीलाधर कांबळी, ठाणे २०१६-१७
12. मा. श्री. बाबा पार्सेकर २०१७-१८
13. मा. श्री जयंत सावरकर२०१८-१९
14. मा. श्री रत्नाकर मतकरी २०१९-२०

संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार


1) संक्षिप्त शिर्षक आणि व्याप्ती -


रंगभूमीची प्रदीर्घ सेवा केलेल्या ज्येष्ठ नाट्य कलाकारास दरवर्षी रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार एका कलाकारास देऊन गौरविण्यात येते.
राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारांची संख्या कमी असल्यामुळे महाराष्ट्रातील इतर अनेक कलावंतांची पात्रता असूनही राष्ट्रीय पुरस्कारापासून वंचित रहावे लागते. त्यामुळे अशा कलाकारांना सदर पुरस्कारासाठी विचार करण्यात येतो.

2) संक्षिप्त शिर्षक आणि व्याप्ती


संगीत रंगभूमीवरील उत्कृष्ट कामगिरी केलेल्या ज्येष्ठ नाट्य कलाकारास दरवर्षी संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार बळवंत पांडुरंग तथा अण्णासाहेब किर्लोस्कर या नावाने पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.

3) पुरस्काराचे स्वरुप


अ) रुपये 5.00 लाख
ब) शाल
क) सन्मानचिन्ह
ड) मानपत्र

4) पुरस्कारासाठी पात्रता -


अ) संगीत क्षेत्रात चिकाटीने एकनिष्ठेने सातत्याने प्रदीर्घ काम केलेल्या ज्येष्ठ संगीत रंगभूमी कलाकार पुरस्कारासाठी पात्र आहे.
ब) कलाकाराची त्यांच्या कलाक्षेत्रातील कर्तृत्वाची ज्येष्ठता सिद्ध असावी.

5) निवड समिती -

1. मा. मंत्री (सांस्कृतिक कार्य) अध्यक्ष
2. मा. राज्यमंत्री, सांस्कृतिक कार्य उपाध्यक्ष
3. मा. सचिव, पर्यटन व सांस्कृतिक कार्य सदस्य
4. संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय सदस्य
.. .
अशासकीय सदस्य :- 
5. मा. अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मुंबई अशासकीय सदस्य
6.मा. संमेलनाध्यक्ष, अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन अशासकीय सदस्यव
7.श्री. उल्हास पवार अशासकीय सदस्य
8.श्री. वामन केंद्रे अशासकीय सदस्य
9.श्रीमती बकुळ पंडित अशासकीय सदस्य
10.श्रीमती नीलाक्षी पेंढारकर अशासकीय सदस्य

संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार यापूर्वी खालील मान्यवरांना सदरचा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे-


अ.क्र.पुरस्कारार्थीचे नाववर्ष
1. मा. श्रीमती फैय्याज, मुंबई २००९-१०
2. मा. श्री. प्रसाद सावकार, मुंबई २०१०-११
3. मा. श्रीमती जयमाला शिलेदार, पुणे २०११-१२
4. मा. श्री. अरविंद पिळगावकर, मंबई २०१२-१३
5. मा. श्री. रामदास कामत, मुंबई २०१३-१४
6. मा. श्रीमती कीर्ती शिलेदार, पुणे २०१४-१५
7. मा. श्रीमती रजनी जोशी, मुंबई २०१५-१६
8. मा. श्री. चंद्रकांत उर्फ चंदू डेगवेकर २०१६-१७
9. मा. श्रीमती निर्मला गोगटे २०१७-१८
10. मा. श्री विनायक थोरात २०१८-१९
11. मा.श्रीमती मधुवंती दांडेकर २०१९-२०