सांस्कृतिक कार्य संचालनालय

(०२२) २२८४ २६३४

      |  टेक्स्ट साईझ   

प्रजासत्ताक दिन, नवी दिल्ली येथील महाराष्ट्र राज्याच्या चित्ररथाची माहिती

26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रतिवर्षी नवी दिल्ली येथे चित्ररथाचे संचलन करण्यात येते. सदर संचलनासाठी महाराष्ट्र राज्यातून चित्ररथ पाठविण्याचे काम सांस्कृतिक कार्य संचालनालय विभागामार्फत करण्यात येते. यासाठी प्रतिवर्षी एक विषयाची निवड करुन त्या विषयाच्या चित्ररथाच्या संकल्पनेचे चित्र संरक्षण मंत्रालय, नवी दिल्ली यांचेकडे मान्यतेस्तव पाठविण्यात येते. त्यांच्या मान्यतेनंतर या विषयानुसार चित्ररथ तयार करुन 26 जानेवारीला नवी दिल्ली येथे सादर करण्यात येते.

सन २०१८ या वर्षासाठी छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा या विषयावर चित्ररथाचे सादरीकरण करण्यात आले होते. या नेत्रदीपक चित्ररथास सर्वोत्कृष्ट सादरीकरणाचे प्रथम पारितोषिक प्राप्त झाले.

शासनातर्फे आजपर्यंत विविध विषयांवर चित्ररथांचे संचलन करण्यात आले असून महाराष्ट्र राज्याला आजपर्यंत सहा वेळा प्रथम पारितोषिक, तीन वेळा द्वितीय पारितोषिक व एकदा तृतीय पारितोषिक प्राप्त झाले असून सन 1993, 1994 व 1995 या तीन वर्षी सलग पहिले पारितोषिक राज्यास प्राप्त झाल्याने वैजयंता चषक कायमस्वरुपी मिळाला आहे. तसेच सन 2015 च्या चित्ररथ संचलनात पंढरीची वारी या चित्ररथाचे सादरीकरण करण्यात आले. राज्याचे सांस्कृतिक वैभव असलेल्या या वारीला सर्वोत्कृष्ट सादरीकरणाचा पहिला क्रमांक मिळाला. सन २०१७ यावर्षासाठी प्रजासत्ताक दिन चित्ररथ संचलनात लोकमान्य टिळक या विषयावर चित्ररथाचे सादरीकरण करण्यात आले होते. या चित्ररथास सर्वोत्कृष्ट सादरीकरणीचा तृतीय क्रमांक मिळाला.