सांस्कृतिक कार्य संचालनालय

(०२२) २२८४ २६३४

      |  टेक्स्ट साईझ   

अनुदान योजना

नाट्यनिर्मिती संस्थांना  नवीन नाट्य निर्मितीसाठी अनुदान योजना
नाट्य निर्मिती संस्थांना नवीन नाट्य निर्मितीसाठी अनुदान देण्याची योजना शासनामार्फत २००६ पासून कार्यान्वित करण्यात आली आहे. उत्तम दर्जाच्या व्यावसायिक नाटकांची निर्मिती व्हावी व ही नाटके मुंबई, पुणे व इतर शहरांत सवलतीच्या दरात प्रेक्षकांना पहावयास मिळावी हा त्यामागचा हेतू आहे. या योजनेची ठळक वैशिष्टे खालीलप्रमाणे-

1. नाट्य संस्थांना नव्या नाटकाची प्रयोग निर्मिती व प्रयोग करण्यासाठी अर्थसहाय्य दिले जाते.
2. सदर अर्थसहाय्य नाट्यप्रयोगाच्या संख्येप्रमाणे देण्यात येते.
3. हे अर्थसहाय्य रु.25,000/- एका गद्य प्रयोगासाठी दिले जाते
4. संगीत नाट्य निर्मितीसाठी रु.30,000/- एवढे प्रती प्रयोगासाठी अनुदान देण्यात येते.

याकरिता अ व ब असे वर्गीकरण करण्यात आले आहे. अनुदान वर्गीकरण करण्यासाठी शासनाने नाट्य क्षेत्रातील मान्यवरांची समिती नियुक्ती केली आहे. या योजनेंतर्गत व्यावसायिक नाट्य निर्मात्यांनी नवीन नाट्य निर्मितीसाठी चालना मिळाली आहे.

अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनास अनुदान

सन २००४ पासून प्रतीवर्षी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनासाठी शासनामार्फत रक्कम रुपये २५ लक्ष इतके अनुदान वितरीत करण्यात येते.