महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक निधीची स्थापना शासन निर्णय क्रमांक मसांधो २०१०/रासानि २०११/ प्र.क्र.१२२/अर्थसं दिनांक ९ ऑगस्ट २०१२ अन्वये करण्यात आली असून हा निधी शासनाचे योगदान व लोक सहभागातून उभारण्यात येत आहे.
१ | नाव | महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक निधी, मुंबई | |
२ | संपूर्ण पत्ता | सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र शासन, जुने सचिवालय, विस्तार भवन, एम.जी.रोड, मुंबई ४०० ०३२ | |
३ | निधीचा स्त्रोत | १) | राज्य शासनाचा प्रथमवर्षी रु. १ कोटी हिस्सा, त्यानंतर पुढील दोन वर्ष रु. ५० लाख प्रतिवर्ष व त्यापुढील दोन वर्ष रु. २५ लाख प्रतिवर्ष याप्रमाणे शासकीय अर्थ सहाय्य देण्यात येईल. |
२) | केंद्रशासन व केंद्रशासित प्रदेश तसेच राज्यातील विविध महामंडळे/मंडळे व स्थानिक स्वराज्य संस्था यांच्याकडून देण्यात येणारा निधी. | ||
३) | खाजगी क्षेत्र, विश्वस्त संस्था तसेच नागरिक यांच्याकडून मिळणारी देणगी. | ||
४) | शासनाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या दूरदर्शनवरील प्रक्षेपणासाठी दूरदर्शन वाहिन्यांकडून प्रायोजकात्वातून प्राप्त होणारी रक्कम तसेच कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्रायोजकांकडून मिळणाऱ्या रक्कमेतील शिल्लक राहणारी रक्कम. | ||
४ | निधीचा विनियोग | १) | लुप्त होणाऱ्या दुर्मिळ प्रयोगात्मक कलांचे तसेच वाद्यांचे जतन व संवर्धनाचे उपक्रम राबविणाऱ्या संस्थांना गुणवत्तेनुसार अर्थसहाय्य. |
२) | राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयोगात्मक कलांच्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी गुणवंत व गरजू कलावंतांना आर्थिक मदत. | ||
३) | राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारप्राप्त कलावंतांचा सत्कार. | ||
४) | प्रयोगात्मक कलाक्षेत्रात मूलभूत संशोधन करणाऱ्या गरजू संस्था/ व्यक्तींना गुणवत्तेनुसार आर्थिक मदत. | ||
५) | खाजगी संस्था/व्यक्ती यांच्याकडील ऐतिहासिकदृष्टया व पुरातत्त्वदृष्ट्टया मौल्यवान व जतनयोग्य वस्तुंकरिता वस्तुसंग्रहालय उभे करण्यासाठी अर्थसहाय्य. | ||
६) | याव्यतिरिक्त संनियंत्रण समितीच्या मान्यतेने इतर महत्त्वाच्या प्रयोजनांसाठी अर्थसहाय्य. | ||
७) | गरज भासल्यास तात्काळ उद्भवणाऱ्या बाबींसाठी मा. मंत्री, सां.का. तथा अध्यक्ष, सनियंत्रण समिती यांच्या मान्यतेने निधीचा विनियोग करणे व त्यास सनियंत्रण समितीच्या आगामी बैठकीत कार्योत्तर मान्यता घेणे. | ||
टिप:- | १) | उपरोक्त प्रयोजनासाठी देण्यात येणारा निधी हा अनावर्ती स्वरुपाचा असेल. एकाच संस्थेस अथवा व्यक्तीस एकदा अर्थसहाय्य केल्यानंतर पुन:पुन्हा त्याच प्रयोजनासाठी सांस्कृतिक निधीतून अर्थ सहाय्य करण्यात येणार नाही. | |
२) | उपरोक्त प्रयोजनासाठी एखाद्या व्यक्तीस अथवा अर्थसहाय्य करण्यासंदर्भात सनियंत्रण समितीने घेतलेला निर्णय हा अंतिम असेल. | ||
५ | व्याप्ती | राज्य सांस्कृतिक निधीचा विनियोग केवळ महाराष्ट्र राज्यापुरताच समीती राहिल. | |
६ | आर्थिक वर्ष | या निधीच्या हिशोबासाठी आर्थिक वर्ष १ एप्रिल ते ३१ मार्च राहील. |