महाराष्ट्र राज्यातील विविध प्रयोगसिध्द कलांचा विकास करणे, कलाकारांची त्यांच्या कलेविषयीची जाण अधिक प्रगल्भ करणे तसेच कलाकारांच्या अंगी असलेले गुण अधिक वृध्दींगत करण्याच्या उद्देशाने प्रतिवर्षी नाट्य, किर्तन, शाहिरी, तमाशा व बालनाट्य या कलांच्या प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्यात येते.
ही प्रशिक्षण शिबिरे सन १९९१ पासून आयोजीत करण्यात येतात. या शिबिरात २० प्रशिणार्थी असतात. शिबिरासाठी एका तज्ञ शिबिर संचालकांची नियुक्ती करण्यात येते व शिबिर संचालकांच्या सहाय्याने १५ व्याख्यात्यांची नियुक्ती करण्यात येते. शासनाच्या परवानगीने कुठे शिबिर घ्यावयाचे त्या ठिकाणांची निश्चिती झाल्यानंतर त्या ठिकाणी शिबिर घेण्यात येतात. शिबिरार्थींना पाठ्यवेतन नियमानुसार देण्यात येते. शिबिर संचालक, व्याख्याते यांना नियमानुसार मानधन, प्रवासभत्ता आणि दैनिक भत्ता देण्यात येतो.
सन २०१६-१७ या वर्षात खालील ठिकाणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.
अ.क्र. | शिबिर | ठिकाण |
1) | नाट्य प्रशिक्षण शिबिर | खानापूर (पुणे) |
2) | बालनाट्य प्रशिक्षण शिबिर | देवरुख ( रत्नागिरी) |
3) | किर्तन प्रशिक्षण शिबिर | अंबेजोगाई (बीड) |
4) | तमाशा प्रशिक्षण शिबिर | वेळे (पुणे) |
5) | शाहिरी प्रशिक्षण शिबिर | नगरदेवळा (जळगाव) |