केंद्र सरकारच्या अनुदान देण्याच्या योजने अंतर्गत महाराष्ट्रातील सांस्कृतिक कार्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्थांना अनुदान दिले जाते. सदर संस्था केंद्र शासनाच्या वेबसाइटवर (www.indiaculture.nic.in) उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे संचालनालयाकडे अर्ज सादर करतात. संचालनालयाकडे संस्थांचे अर्ज प्राप्त होताच संस्था अनुदानास प्राप्त आहे किंवा नाही हे उपलब्ध कागदपत्रांची छाननी करून तपासले जाते. शिफारशीसाठी पात्र असलेले अर्ज वस्तुनिष्ठ अहवालासह शासनाकडे त्वरित पुढील कार्यवाहीसाठी पाठवून देण्यात येतात.
महाराष्ट्र शासनाच्या वृद्ध कलावंत मानधन योजनेचा लाभ घेत असलेल्या कलाकारांची शिफारस सदर योजनेसाठी करण्यात येते .
निकष – वयाची ६० पूर्ण
उत्पन्न ४८००० /- मर्यादेत
राज्याचे मानधन मिळणे आवश्यक
Indiaculture.nic.in या केंद्र सरकारच्या संकेत स्थळावर या योजनेचा अर्ज असून संबधित कलाकाराने अर्जाच्या मार्गदर्शक सुचनाप्रमाणे अर्ज करावा .
अर्जासोबत जोडावयाचे कागदपत्रे : १ आधारकार्ड / २ बँक पासबुक / ३ कार्यक्रमाचे पुरावे / ४ शिफारसपत्र